मुखेडात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा ? मोटारसायकल रॅलीत महिलांची लक्षणीय उपस्थिती ? रॅलीमधील शालेय देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड :  प्रतिनिधी
      महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मुखेड शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आले. बुधवारी सकाळी १० वाजता शहरातील शिवस्मारकात नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्या हस्ते शिवध्वजारोहन करण्यात आले.
               यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार काशिनाथ पाटील, आ.डाॅ.तुषार राठोड, जेष्ठ नेते सदाशिवराव पाटील जाधव,  पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, मराठवाडा भुषण डाॅ.दिलीप पुंडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीराम गरुडकर, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पा.कबनुरकर, माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील, नामदेव पा.जाहूरकर, मुन्नवर शेख, शेकाप जिल्हाध्यक्ष अॅड.गोविंद पाटील डुमणे, पत्रकार संघाचे रियाज शेख, रामदास पाटील, समिती अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, उपाध्यक्ष शंकर वड्डेवार, सचिव शंकर चिंतलवाड, नागनाथ पा.जुन्ने, साईभक्त मंडळ, डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम समाजसेवा समितीचे पदाधिकारी  सह शिवप्रेमी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर सकाळी ठीक १०.३० वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. मोटार सायकलरॅलीची सुरुवात संभाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज स्मारकाजवळ सांगता झाली . सायंकाळी ठीक 4:30 वाजता शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीची सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला होता.
           यामध्ये राजमाता जिजाऊ निवासी वस्तीग्रहाचे ढोल पथक, लेझीम पथक, ध्वजपथक, जि.प. ब्रॅच शाळेचे लेझीम पथक, जिजाऊ ज्ञान मंदिर मुखेड चे शिवजन्मोत्सव व राज्याभिषेक सोहळा हे दोन चित्ररथ, गुरुदेव प्राथमिक शाळेचे आग्र्याहून सुटका हा चित्ररथ, एम के एस इंग्लिश स्कूल चे तुळजाभवानी कडून व शिवाजी महाराजांना तलवार भेट हा चित्ररथ अनेक घोडे, उंट, भजनी मंडळ अशा विविध कार्यक्रमांनी शिवजयंतीची भव्यदिव्य मिरवणूक मुखेड शहरातून सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. साई भक्त मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. मुस्लिम समाजाच्या वतीने रॅलीतील सर्व शिवभक्तांना पाणी वाटप व पुष्पवृष्टी करण्यात आली.