शिवजयंतीनिमित्य राजमाता जिजाऊ वस्तीगृहाकडून भव्यदिव्य रॅली ; शिवरायांच्या जयघोषाने दणदणली मुखेड नगरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : प्रतिनिधी
         मुखेड येथील राजमाता जिजाऊ निवासी वस्तीगृहात शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. 19 फेब्रुवारीला मुखेड मध्ये निघालेल्या मिरवणूकीत राजमाता जिजाऊ वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक तयार केले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने ढोल पथक लेझीम पथक व ध्वज पथक याची तयारी केली होती.ही रॅली सकाळी 8:30 वाजता छत्रपती संभाजीराजे चौकातून शिवाजी महाराज यांचे स्मारकाजवळ आली व ध्वजारोहणासाठी आलेल्या मान्यवरांच्या समोर सर्वांनी आपली कला दाखवली सर्व मान्यवरांनी या रॅलीचे तोंडभरून कौतुक केले.ठीक साडेनऊ वाजता ध्वजारोहण करून ही रॅली मुखेड शहरातून नवीन पोलीस स्टेशनपासून राजमाता जिजाऊ निवासी वसतिगृह कडे आली.
या रॅली मधील ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक व मावळ्यांच्या वेशातील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. घोड्यावरुन बाल शिवबा, जिजाऊ व मावळे आदि ऐतिहासिक भूमिकेवर पात्र वटवनारी मुले व मुली सहभागी झाले होते. ‘क्षत्रिय कुलावंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ च्या जयघोषात सारे वातावरण दणाणून गेले होते. ‘तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय’, ‘तुमचं आमचं कोणत मंदिर जिजाऊ शिवबा दिल के अंदर’, तुमचे आमचे राजे कोण शिवबा शंभुराजे दोन’ यासारखी विविध जनजागृतीपर घोषवाक्य यांचा जयघोष जल्लोषात केला. छत्रपती शिवजन्मोत्सवासाठी सहभागी होण्यासाठीचे विशेष मार्गदर्शन वस्तीग्रहाचे संचालक गंगाधर बिरादार यांनी केले तर शिवकुमार बिरादार, सूर्यवंशी सर, शैलेंद्र हिवराळे,सुरज व शशिकांत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रोत्साहित केले, वेशभूषा मेकअप आदीसह मिरवणूक सर्वांनी चांगली मेहनत घेतली. माजी जि. प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मुखेड भूषण  डॉ. दिलीप पुंडे ,डॉ. व्यंकट सुभेदार,
जगदीश बियाणी,बालाजी पाटील कबनूरकर, बालाजी पाटील सांगवीकर, जाजु  शेठ, सदाशिव पाटील, रामदास पाटील, शंकर पाटील जांभळीकर, किरण पाटील बोडके, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर ,संतोष इंगोले, सचिन इंगोले यांनी रॅलीला भेटून विशेष कौतुक केले.