“वारिस पठाणसारख्याची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यात आहे”

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

नागपूर | एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा भाजप नेते गिरीश व्यास यांनी जोरदार समचार घेतला आहे.

वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिम्म्त करत नाही. वारिस पठाणसारखी जहरी टीका करणाऱ्यांची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यात आहे, असं गिरीश व्यास यांनी म्हटलं आहे.

वारिस पठाणने एकदा नागपुरात येऊन दाखवावं, आम्ही त्यांची योग्य व्यवस्था करू. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारिस पठाणवर मुंबईबंदीची कारवाई करुन अटक करावी, अशी मागणी गिरीश व्यास यांनी केली आहे.

दरम्यान, आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहे, असं चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केलं होतं. त्यावरुन देशभरात वाद उफाळला आहे.