ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होत आहेत

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

नवी दिल्ली | पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठवण्यात येत होते. पण आता औवेसी सारख्या व्हायरसने भारतात कसाब तयार होत आहेत, अशी टीका शिया सेंट्रल बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली.

देशात शाहीन बाग सारखीच स्थिती राहिली तर इस्लामिक दाढी ठेवण्याची पद्धत आणि मिशा काढून फिरणारे चेहरे भारताच्या गंगा, यमुना संस्कृतीला नष्ट करून टाकतील असं वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे.

शाहीन बाग सारखे हजारो आंदोलने झाले तरी बेहत्तर पण नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यासाठी माघार घेऊ नये, अशी इच्छा रिझवी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटलं होतं. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत.