लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य नाही झाल्यास 23 मार्चला हातोडा मोर्चा                हातोडयांंनी धरण फोडो आंदोलन करण्याचा इशारा * रावणगांव येथील बैठकीत लेंडी प्रकल्पग्रस्तांचा इशारा * स्व.शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 1986 साली झाले होते उद्घाटन    * सरकारच्या नाकार्तेपणामुळे 54 कोटीचा प्रकल्प 2200 कोटीवर *   सुधारीत कायदयानुसार मावेजा मिळाल्यास 5 हजार 300 कुटूंबाचा होणार फायदा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पग्रस्त बांधीतांना 2013 च्या भुसंपादन विधेयकानुसार मागणी मान्य करुन मावेजा नाही दिल्यास 23 मार्च 2020 रोजी हातोडा मोर्चा काढणार असल्याचे शेतकरी नेते गुणवंतराव पाटील हंगरेकर यांनी दि. 20 रोजी रावणगाव येथील घेण्यात आलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत प्रशासनाराला इशारा दिला आहे. तर सुधारीत कायदयानुसार मावेजा मिळाल्यास 5 हजार 300 कुटूंबाला याचा होणार फायदा होणार असून या धरणासाठी 2600 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.

मुखेड तामलुक्यातील मौजे गोणेगाव येथे लेंडी नदीवर सन 1986 रोजी धरण बाधण्यास सुरवात झाली होती तेंव्हा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 1986 या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाची 54 कोटी रुपये रक्कम होती पण सध्या ती रक्कम 2200 कोटी रुपये पर्यंत गेली आहे. गेल्या तीन दशकापासुन वेगळ्या कारणामुळे या प्रकल्पाचे काम रखडलेले असुन मागील भाजपाच्या सरकारमध्ये सुध्दा हे काम पुर्ण होऊ शकले नाही.

सध्या मााजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यात मंत्रीपद मिळाले याचा फायदा घेत त्यांनी पाठपुरावा करुन 2200 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेतली असुन लेंडी प्रकल्पग्रस्तांना 2013 च्या सुधारित कायद्यानुसार भूसंपादनाचा मावेजा मिळावा व 2013 सालच्या नवीन सुधारित महसूल कायद्या प्रमाणे जमीनीचा वाढीव दर बाजारभाव प्रमाणे देण्यात यावा.

तर 11 बुडीत क्षेत्रातील गावात 24 नागरी सुविधापैकी कुठलीही सुविधा पुरविण्यात आलेली नाही तर ग्रामसभा घेउन ग्रामस्थाला विश्वासात न घेता प्रोसेडिंग तयार करण्यात आली आहे असा आरोप धरणग्रस्तानी यावेळी केला. दरम्यान आजपर्यत या धरनावर शासनाने 507 कोटी रुपयेे खर्च केले असून अता हा प्रक्लप 2200 कोटीवर गेला आहे मग जमीनीचा भाव जुन्या दराने का ? असा सवालही प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे.

लेंडीधरणाचे काम सुरू  करण्यापूर्वी बाधीत क्षेत्रातील 11 गावातील ग्रामस्थांशी चर्चा करु विश्वासात घ्यावे व मागण्या पूर्ण करावीत मगच आंतरराज्य लेंडी प्रकल्पाचे काम सुरू  करावे अशी मागणी धरणग्रस्तांनी रेटून धरली.

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी 11 बुडीत क्षत्रातील धरणग्रस्तांनी शेतकरी संघटनेचे अखिल भारतीय सचिव  गुनवंत पाटील हंगरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व धरणग्रस्त नेते राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणावर पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष हानमंत खंडागळे ऊपाध्यक्ष माधव अप्पा नुच्चे, जैनुदिन पटेल, बाळासाहेब देशमुख कोळनुरकर, शेशिकांत देशपांडे हासनाळकर, अशोक कुलकर्णी,  मशरू  पटेल, निळकंट पाटील, सुधाकर कुलकर्णी आदीसह शेकडो धरणग्रस्तांची उपस्थिती होती.