नांदेडच्या भुजल सर्व्हेक्षणात आढळले 6.40 टक्के फ्लोराईड

नांदेड नांदेड जिल्हा

 

नांदेड: वैजनाथ स्वामी 

नांदेड जिल्ह्यात भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमार्फत 16 तालुक्यातील 937 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यात 60 नमुने फ्लोराईड बाधित आहेत. ही टक्केवारी 6.40 अशी आहे. सर्वाधिक फ्लोराईड बाधित पाण्याची टक्केवारी भोकर तालुक्यात आहे. तेथे फ्लोराईड बाधित पाण्याची टक्केवारी 14.29 आहे. ही सर्व माहिती वरिष्ठ भुवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फेबु्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केलेली आहे.

नांदेड जिल्ह्यात जमीनीखाली असणाऱ्या पाण्याच्या संदर्भाने वेगवेगळ्या चर्चा घडतात. त्यात झालेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यांच्या पाण्याची तपासणी झाली. त्यातील 2 तालुक्यांमध्ये पाण्याची तपासणी शुन्य आहे. म्हणून त्या भागात पाण्यामध्ये फ्लोराईड या रासायनिक पदार्थाची गणणा काय आहे हे समजले नाही.

वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तपासण्यात आलेल्या पाण्यांच्या नमुन्यांची संख्या आणि त्यातील फ्लोराईड बाधित संख्या टक्केवारीसह पुढील प्रमाणे कंसात लिहिली आहे. बिलोली-22(1-4.55 टक्के), किनवट-193(24-12.44), माहूर-69(1-12.44), कंधार-16(2-3.33), लोहा-52(2-3.85), हदगाव-5(0-00), उमरी -15(1-6.67), धर्माबाद-77(11-14.29), भोकर-9(2-22.22), मुखेड-58(8-13.79), नायगाव-93(6-6.45), नांदेड-98(0-00), अर्धापूर-122(1-0.82), मुदखेड-64(1-1.56) एकूण- 937(60-6.40) अशी फ्लोराईड बाधित पाण्याची परिस्थिती आहे.

या 16 तालुक्यांची तपासणी करतांना देगलूर आणि हिमायतनगर या दोन तालुक्यांमधील पाण्याची तपासणी झाली नाही. पण कधी काळी मरखेल, देगलूर, मुक्रामाबाद आदी ठिकाणी फ्लोराईड युक्त पाणी सापडल्याने राज्यभरासह देशातील अनेक वैज्ञानिकांनी या गावांना भेटी दिल्या होत्या. आणि त्यावेळी फ्लोराईड युक्त पाण्याची तपासणी आणि त्यावरील उपाययोजना या प्रकारावर मोठा अभ्यास झाला होता. पण 2020 मध्ये भुजल सर्व्हेक्षण करतांना देगलूर तालुक्याच्या पाण्याची तपासणीच झाली नाही. तसेच हिमायतनगर तालुक्यात सुध्दा पाण्याची तपासणी झालेली नाही.