पांच एकर जागेत दिल्ली पॅटर्नची शाळा बांधणार ; सचखंडच्या विद्यार्थ्यांच्या कलगुणांची ’उडारी ’ ने केले मंत्रमुग्ध

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड:  वैजनाथ स्वामी

 

गुरुद्वारा तख़्त सचखंड बोर्ड नांदेड़ संस्था संचलित सचखंड पब्लिक स्कुल इंग्रजी मीडियम शाळेचा भव्य-दिव्य असा उडारी विद्यार्थी स्नेह सम्मेलन सोमवार दि.17 रोजी सायंकाळी साहबजादा बाबा फतहसिंघजी मंगल कार्यालय मैदानावर जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात आठशे विद्यार्थी आणि पालकांनी मंचावर सादर कलगुणांच्या आकाशात होत असलेली भरारी अनुभवली.

उडारी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंचावर गुरुद्वारा बोर्डचे सचिव स. रविन्दरसिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य स. नौनिहाल सिंघ जहागिरदार, स. गुलाबसिंघ कंधारवाले, गुरुद्वारा अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी.पी. सिंघ , स. ठानसिंघ बुंगाई, स. नरायणसिंघ नंबरदार, स. रविंदरसिंघ कपूर, स. अवतारसिंघ पहरेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंच म्हणून सुरप्रसिद्ध नृत्यकार डॉ. भारत जेठवानी आणि सौ. संगीता नरेश ढाणीवाला हे अवार्जुनपणे उपस्थित होत्या. अतिरिक्त सहायक अधीक्षक आणि सचखंड पब्लिक स्कुलचे प्रभारी प्राचार्य स. रणजितसिंघ चिरागीया यांनी सर्व अतीथींचे शाल, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले.

सुरुवातीला कार्यक्रम प्रस्ताविकात रणजीतसिंघ चिरागीया यांनी सांगितले की, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास यांच्या संकल्पने अनुसार सचखंड पब्लिक शाळा प्रगती साधत आहे. या स्नेहसम्मेलनात सर्वधर्म समभाव , एकात्मता, राष्ट्रभक्ति आणि लोककलासारख्या कालांचा सादरीकरण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सारख्या विषयांवर भर टाकण्यात आली आहे. सचखंड पब्लिक स्कुल ही व्यावसायिक प्रणालीची शाळा नसून गुरुद्वारा बोर्डाने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च प्रणालीचे शिक्षण देण्यासाठी सुरु केलेली शाळा होय.

कार्यक्रमाचे उद्धघाट्क स. रविंदरसिंघ बुंगाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की गुरुद्वारा बोर्डाने मा. अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिन्हास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, नविन शाळा इमारत उभारणीसाठी योजना तयार केली असून दिल्लीच्या सरकारी शाळांच्या केजरीवाल विकास पॅटर्न वर आधारित पाच एकर जागेत भव्य अशी आधुनिक तंत्रज्ञान असलेली शाळा उभारण्यात येणार आहे. आपला पाल्य शाळेत बसून काय करीत आहे याची माहिती पालकांना त्यांच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध व्हावी असे प्रयत्न सुरु आहेत.
स. नौनिहालसिंघ जागीरदार यांनी पालकांना उद्देशून सांगितले, आजच्या युगात शिक्षणाचे महत्व काय आहे ते ओळखून गुरुद्वारा बोर्डाने त्या प्रकारचे शिक्षण देण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे. आजचे भव्य आणि शाळेचे पहिलेच स्नेहसंमेलन त्याची झलक आहे.
’उडारी’ मध्ये विविध प्रकारच्या 28 कार्यक्रमांचे सादरीकरण प्रस्तुत करण्यात आले. त्यात राजस्थानी, गुजरती, पंजाबी, मराठी भाषेचे लोकगीतं, बॉलीवुड गाणी, गोंधळ, भांगडा, नाटक, देशभक्ति सन्देश प्रसारित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. हरसिमरनकौर अजयपालसिंघ लांगरी यांनी केले. तर नृत्यनिर्देशन आणि नियोजनात रणदीपकौर बैंस आणि इतर शिक्षिकांनी परिश्रम घेतले. शाळेने कोरियोग्राफर ना वापरता शाळेतच सर्व तयारी करून घेतली होती. हे भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्यासाठी तीन हजारवर पालक आणि श्रोता उपस्थित होते.