पवारसाहेब माहिती न घेता बोलतात : निलेश राणे

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना करण्याची माहिती वक्फ बोर्डाने पूर्वीच दिली होती. ‘इन्डो इस्लामिक कल्चर ट्रस्ट’, अशा नावे ट्रस्टची स्थापना होणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाने दि. ५ फेब्रुवारी रोजीच दिली होती. पवार साहेबांसारखा मोठा माणूस माहिती न घेता वक्तव्य करतो हे आश्चर्य आहे, अशी प्रतिक्रीया माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. याबद्दलच्या बातमी शेअर करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे.

 

“राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना केली जाते मग मशिदीसाठी का नाही, देश सर्वांचा आहे सर्वांसाठीच आहे” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला सवाल विचारला. लखनऊ येथील एका सभेदरम्यान ते बोलत होते. यावरून आता शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. वक्फ बोर्डाने स्वतःच ट्रस्ट स्थापन करण्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली होती. मात्र, माहिती न घेता पवार असे वक्तव्य कसे करतात, असा सवाल आता निलेश राणे यांनी विचारला आहे.