कॉग्रेसनेते भाऊसाहेब मंडलापुरकर यांची घेतली आ.डॉ. तुषार राठोड यांनी सदिच्छा  भेट

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मागील विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसचे नेते भाऊसाहेब मंडलापुरकर यांचा थोडक्या मताने पराभव झाला. निवडणूक संपल्यानंतर काही महिण्यांनी त्यांची तब्येतीत अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना मुंबई येथील दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते.

मुंबई येथील रुग्णालयातुन बरे वाटु लागल्याने त्यांच्या मुळ गावी मंडलापुर येथे ते आल्यानंतर अनेकांनी त्यांची भेट घेऊन विचारपुस केली. दि. 20 रोजी मुखेडचे आ.डॉ. तुषार राठोड यांनी सुध्दा त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारणा केली व पुढील आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या.


      याअगोदर हिंगोलीचे मुख्याधिकरी रामदास पाटील, माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अविनाश घाटे, नगरसेवक राजु बामणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.