व्हॉट्सअपवर पेपर व्हायरल प्रकरणी विद्यार्थ्यासह केंद्रसंचालक, पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल ; मुखेड येथील नृसिंह विद्यामंदीर केंद्रावर घडलेला प्रकार  , गटशिक्षणाधिकारी यांनी दिली तक्रार

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

  मुखेड तालुक्यतील नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर 12 वी चा इंग्रजी विषयाचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याप्रकरणी विद्यार्थ्यासह केंद्रसंचालक, पर्यवेक्षकावर दि. 19 रोजीच्या रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी राम भारती यांच्या फिर्यादीनुसार तालुक्यात 12 वी चे 10 परिक्षा केंद्र असुन त्यातील नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर परिक्षा चालु असताना ए.बी.सी.डी. असे चार प्रश्न संच होते. या परिक्षा केंद्रावर नऊ हॉलमध्ये परिक्षा चालु होती त्यापैकी हॉल क्र. 6 मध्ये केंद्रसंचालक व पर्यंवेक्षकांचीे शिक्षण विभागाच्यावतीने नेमणूक करण्यात आली होती. परिक्षा सुरु असताना हॉल क्र. 6 मधुन सी क्रमाकांची टि. 053154 या क्रमांकाची एका विद्यार्थ्याने  प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल केली असे तक्रारीत नमुद आहे.

याप्रकरणी नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षकासहीत संबंधीत विद्याथ्र्यावर  मुखेड पोलिसात  महाविद्यालयीन मंडळ व इतर विर्निदीष्ठ परिक्षेत होणारे गैर प्रकार प्रतिबंधक कायदा 1982 कलम 6 व आय टी अॅक्ट 66 अ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास मुखेड पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर हे करीत आहेत.


            शिक्षणाधिका­ऱ्यांंची व लातुर विभागातील कर्मचा­ऱ्यांंची विद्यालयास भेट

याप्रकरणी शिक्षणाधिकारी बी.आर कुंडगीर, उपशिक्षणाधिकारी एम.एस. सलगर, लातुर शिक्षण मंडळाचे कर्मचारी एस.एल. राठोड यांनी नृसिह माध्यमिक विद्यालयास भेट देऊन गटशिक्षणाधिकारी यांना अहवाल सोपवून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत एस.जी शेटकार, बि.एम. पाटील  यांची उपस्थिती होती.


प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मुखेडात कॉप्या !

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मुखेडात कॉप्या चालु असुन कॉपी बंद करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्याचे चित्र आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्हा कॉपीमुक्तीकडे वाटचाल केला होता पण तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यानंतर कॉपीयुक्त परिक्षाकडे पुन्हा नांदेड जिल्हा वळल्याचे दिसून आले. सध्याचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर हे याप्रकरणाकडे व कॉपी बंद करण्यासाठी


याप्रकरणी ज्या केंद्रावर परीक्षा चालू होती त्या संस्थेवर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसुन भविष्यात या विद्यालयात परिक्षा केंद्र असुन नये असे सुज्ञ पालकांकडुन ऐकायला मिळत आहे.