मुखेडात शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक              विविध लोकप्रबोधन कार्यक्रमाने सांगता            व्याख्यान, ,लोकनृत्य,सांस्कृतिक कार्यक्रम, मॅरेथान स्पर्धा गाजल्या 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुखेड शहरात घेण्या आलेल्याभरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात व्याख्यान, लोकनृत्य,सांस्कृतिक, मॅरेथान स्पर्धा, विद्यार्थी करीअर मार्गदशर्न मेळावा अशा विविध कार्यक्रमाने दि. १९ रोजी मोठया उत्साहात शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यामध्ये दि. 19 फेब्रुवारी सकाळी ध्वजारोहन करुन शहरातून भव्य मोटार सायकल रॅली राजमुद्रा ग्रुपच्या वतीने काढण्यात आली तर दुपारी 3 च्या सुमारास शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात लेझीम, शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, घोडेस्वार, तलवारबाजी, भालाफेक, मल्लखांब, पु्ष्पवृष्टी, अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली तर विविध शाळेच्या विद्यार्थानी यामध्ये सहभाग घेऊन प्रबोधनात्मक अप्रतिम देखावे ही सादर केले.
                  यावेळी  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन पाटील इंगोले यांच्यासह अनेकांनी  शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर यावेळी पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.