ड्रीम मॅरेथॉन स्पर्धेस राज्यस्तरीय स्वरूप देणार- खा. प्रताप पाटील चिखलीकर ….. ड्रीम मॅरेथॉन स्पर्धेतस उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड : वैजनाथ स्वामी

रन फॉर छत्रपती….ड्रिंम मॅराथॉन स्पर्धेचा प्रतिसाद पाहता पुढील वर्षापासून या स्पर्धेला राज्यस्तरीय स्वरुप देण्यात येणार असून, बक्षिसांच्या रक्कमेतही वाढ करण्यात येणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केले.


भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले आयोजित ड्रिंम मॅराथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयोजक तथा भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, संजय कौडगे, अरुंधतीताई पुरंदरे, अशोक पाटील धनेगावकर, संयोजक कुणाल गजभारे आदींची उपस्थिती होती.


ड्रिंम मॅराथॉन स्पर्धेत अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढीलवर्षी या स्पर्धेत भारतीय जनता पार्टी संयोजनामध्ये प्रमुख भूमिका निभावणार असून, स्पर्धकांच्या राहण्याची व्यवस्था तसेच बक्षिसांची रक्कम देखील वाढविण्यात येणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केले.


शिवजयंतीनिमित्त भाग्यनगर येथे सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या स्पर्धेत नांदेडसह परभणी, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर येथील स्पर्धक सहभाग झाली. भाग्यनगर, वर्वâशॉप, शिवाजीनगर, कलामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चिखलीवाडी कॉर्नर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, वसंतराव नाईक चौक, आनंदनगर मार्गे भाग्यनगर येथे या स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

पुरुष गटातून परभणी येथील संजय मारोती झाकणे प्रथम, परभणी येथील सचिन पवार व्दितीय, तर परभणी येथील गोपाळ कदम याने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे राजमार्ग कॉपेटेटीव्ह अकॅडमीचे संचालक डॉ. धनंजय देवमाने, अविनाश राठोड, हरभजनसिंग पुजारी यांच्या सौजन्याने बक्षीस वितरण करण्यात आले. तर महिला गटातून परभणी येथील अश्विनी जाधव प्रथम, संस्कृती वऱ्हाड व्दितीय तर अश्विनी कुरुकझाडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना अनुक्रमे भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रवीण बंडेवार, संतोष बेरुळकर यांच्या सौजन्याने बक्षीस वितरीत करण्यात आले.

      तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व टि शर्ट वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास व्यंकट मोकले, व्यंकटेश जिंदम, गोपीले सर, व्यंकटेश साठे, दिपक पावडे, धीरज स्वामी, चंचलसिंह जट, बालाजी शेळगावकर, वैâलास वाघ, सतीश बेरुळकर, आशिष नेरलकर, संदीप कऱ्हाळे, नवल पोकर्णा, बजरंग ठाकुर, हरभजनसिंग पुजारी, नितीन बंडेवार, सोनू उपाध्याय, राजेंद्रसिंह शाहू, शंकर वानेगावकर, श्रीराज चक्रावार, रुपेश व्यास, सुरेश निलावार, संतोष परळीकर, सूर्यकांत कदम, गणेश मोरे, बाळू लोंढे, विशाल शुक्ला, राज यादव, अभिजित देशमुख, आनंद पावडे, बागड्या यादव, संदीप पावडे, मनोज जाधव, मारोती वाघ, सुनील भालेराव, सुनील रामदासी, जनार्दन वाकोडीकर, सोनू कल्याणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू कपाटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक कुणाल गजभारे, डॉ.धनंजय देवमाने, अविनाश राठोड, राघोजीवार, पांचाळ, कुलकर्णी, शेख सलीम, तोडेवाड, महाजन, संदीप शिरसे, शिवा डांगे यांनी परिश्रम घेतले.