ऊर्दू घराची पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पहाणी

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

 नांदेड :  वैजनाथ स्वामी 

नांदेड शहरातील मदिनानगर येथील मदिना तुल उलून शाळेजवळ महानगरपालिकेच्या भुखंडावर बांधण्यात आलेल्या ऊर्दू घराची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पाहणी करतेवेळी म्हणाले, प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास उर्दू साहित्याचा व कलात्मकतेचा प्रसार व विकास नाट्य, शास्त्रीय, नृत्य व त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजनासाठी करण्यात येत आहे. इतर वेळी उर्दू शिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वप्नचे कार्यक्रम घेण्यासाठी ऊर्दू घराचा वापरासाठी असणार आहे. उर्दू घराचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर दिक्षाताई धबाले, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूर, शमीम अब्दुला आदिंची यावेळी उपस्थिती होती.