गंगाधर कौरवाड यांचे निधन

इतर बातम्या नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड / पवन जगडमवार

 तालुक्यातील मौजे आंबुलगा येथील रहिवासी असलेले व जालना बस आगार मध्ये वाहक या पदावर कार्यरत असलेले गंगाधर मारोतीराव कौरवाड यांचे दि.19 रोजी रात्री  2.00 वाजता औरंगाबाद येथे दुःखद निधन झाले.
 त्यांच्या पार्थिवावर आज दि 19 फेब्रुवारी 2020 रोजी  दुपारी 4 वाजता त्यांच्या राहत्या गावी आंबुलगा (बु) येथील स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ते आंबुलगा येथील पोलीस पाटील विठ्ठलराव  कौरवाड यांचे छोटे बंधू तर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर चे मुख्य स्वीय सहायक श्री व्यंकटेश कौरवाड यांचे छोटे बंधू होते त्यांच्या
पाश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई दोन भाऊ, बहिण नातेवाईक असा मोठा परिवार होता.