तळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने तळेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे .

कार्यक्रमाचे उद्घाटक हदगाव हिमायतनगर चे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लाडके नेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या  हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या गावचे भूमिपुत्र अरविंद वसंतराव गायकवाड पशुधन विकास अधिकारी तांत्रिक सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नांदेड राहणार आहेत शिवजयंती निमित्ताने शाहिरी जलसा चे आयोजन मंडळाने केलेले आहे तरी हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिव मंडळाने केले आहे