तृतीयपंथीयांसाठी स्मशानभूमीची जागा लवकरच उपलब्ध करून देणार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्या. रोटे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी 

आयुष्यभर जगण्याच्या खस्ता खाणाऱ्या तृतीयपंथीयांना त्यांच्या मृत्यूनंतरही स्मशानभूमी मिळत नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीचा प्रश्न गंभीर ठरत असतो . नांदेड शहर व जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने लवकरात लवकर प्रयत्न केले जातील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी दिला.
जिल्हा न्यायालय परिसरातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड च्या कार्यालयात प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोडे यांच्या उपस्थितीत आज तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती .या बैठकीत न्यायमूर्ती रोटे यांनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या जाणून घेतल्यानंतर स्मशानभूमीचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याबाबत त्यांना आश्वासित केले. नांदेड शहर व जिल्ह्यात जवळजवळ 300 हून अधिक तृतीयपंथी आहेत. आयुष्यभर असंख्य प्रश्नांचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीयांचे जीवन वेदना आणि समस्यांनी भरलेले आहे. ना कुटुंब, नातेवाईक ,ना जिव्हाळ्याची माणसं अस संघर्षमय जीवन जगणाऱ्या तृतीय पंथांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारीही नसतात .अशा परिस्थितीत तृतीयपंथीयांच्या सामाजिक जीवनातील असंख्य प्रश्न जाणून घेतल्यानंतर तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी लावून धरला. नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी समशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नांदेड महानगरपालिका चे आयुक्त यांना आपण त्वरित चर्चा करू त्या अनुषंगाने तृतीयपंथीयांना लवकरात लवकर स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्‍वास न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी तृतीयपंथीयांना दिला .
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲड. नय्युमखान पठाण, ॲड. सुभाष भेंडे यांच्यासह कमल फाऊंडेशनचे अमरदीप गोधने ,तृतीयपंथीयांचे गुरु गौरी शनुर बकश, अर्चना शानूर बकश, स्मिता शानुर बकश, जय शानुर बकस, दीपा जया बकश मुस्कान जया बकश, वर्षां बकश, नानू बकश, सनम जया बकश ,अंजली गौरी बकश ,कल्याणी गौरी बकश, दिव्या गौरी बकश, रूपा गौरी बकश ,मनीषा गौरी बकश , चाहद गौरी बकश, पुनम वर्षा बकश, संध्या वर्षा बकश, राणी वर्षा बकश, मोनिका वर्षा बकश, बाली वर्षा बकश, शीला अर्चना बकश, मंजुळा वर्षा बकश, संध्या जया बकश आदींची उपस्थिती होती.