मुखेडात 12 वीच्या परिक्षेत कॉप्यांचा बाजार चालूच नृसिंह विद्यामंदीर, शाहीर, एमजेपी महाविद्यालयासह कॉपीयुक्त परिक्षा                 नुतन जिल्हाधिकारी बिपिन ईटणकर लक्ष देतील का ?

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

   बारावीच्या परिक्षेला आज पासुन सुरुवात झाली असुन आज इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली असता कॉपीमुक्त नव्हे तर कॉपीयुक्त परिक्षा झाल्याचे पाहायला मिळाले.

परिक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने कागदोपत्री चांगला बदोबस्त केला पण बंदोबस्त कागदोपत्री पाहायला मिळायला. शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय व शहरापासुन जवळच असलेले नृसिंह विद्यामंदीर येथे बाहेरुन मात्र शांतता दाखवली पण आतून मात्र जोरात कॉप्यांचा बाजार सुरु असल्याचे चित्र दिसत होते.

इंग्रजीचा पेपर असल्याने अनेक विध्यार्थ्यांच्या मनात धाकधुक होती पण आतूनच कॉप्यांचा काळा बाजार सुरु असल्याने काही विध्यार्थ्यांनी सुध्दा सुटकेचा निश्वास टाकल्याचे दिसत होते. तर नृसिंह विद्यामंदीर येथे काही शिक्षकच विध्यार्थ्यांना कॉप्या पुरवित असल्याचे आढळुन आले. यामुळे मुखेडात कशाप्रकारे परिक्षा चालु आहेत यावरुन दिसून येते तर प्रशासन मात्र या परिक्षेत कुचकामी ठरल्याचे दिसत होते.

नवनियुक्त जिल्हाधिकारी बिपिन ईटणकर याप्रकाराकडे लक्ष देतील का  ? असा सवाल सुज्ञ पालकाकडुल विचारला जात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी बिपिन ईटणकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी सारखे कॉपीमुक्त नांदेड करतीय काय ? याकडे सर्वांचेच लक्ष लागुन आहे.