चौकशी समितीची चौकशी करण्यास टाळाटाळ “मौजे जाहुर येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या प्रकारा बाबत्त”

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड  : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर ग्राम पंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या  बांधकामे अर्धवट व अपुर्ण  निकृृृृष्ट कामे बाह्य यंञणेमार्फत निकृृृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत.लाभार्थ्यांना विश्र्वासात न घेता ,आम्ही बांधकाम करुन देतो तुम्ही बांधण्याची गरज नाही,तुम्ही व्यवस्थित बाधणार नाहीत असे सांगुन त्यांच्याकडुन खड्डे खोदण्यासाठी पैसे घेण्यात आलेली आहेत असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.मतदार यादीत नावे नसलेल्या व्यंक्तीच्या नावे रक्कम उचलण्यात आलेली आहे अशा प्रकारे बांधकामाची तक्रार गटविकास अधिकारी  पंचायत समिती मुखेड यांच्याकडे दि.19 डिसेबंर 2019 रोजी करण्यात आलेली होती.

 

सदरील तक्रारीची विविध वर्तमान पञातुन बातम्या प्रसिध्द करण्यात आलेले होते, वर्तमान पञातील बातमीच्या आधारे गटविकास अधिकारी के.व्ही.बळंवत  यांनी दि.30 डिसेबंर 2019 रोजी जाक्र. 5008 या पञात  विस्तार अधिकारी व्ही.एन.गर्जे पंचायत विभाग ,कनिष्ठ अभियंता एच.आर.करखेलीवार ,विस्तार अधिकारी कासार कृृृृषी विभाग अशी ञीसदस्य समीती गठीत करण्यात आलेली होती. सदरील चौकशी समीतीचे सर्व अधिकारी दि.2 जानेवारी 2020 रोजी जाहुर येथील काही स्वच्छालयाची चौकशी करण्यात आलेली होती. व आम्ही पुन्हा येऊन चौकशी करु असे सांगुन वेळ मारुन नेली. पुन्हा आजतागयत चौकशी समीतीचे अधिकारी जाहुर येथे येऊन चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

 

गटविकास अधिकारी यांनी चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सात दिवसाच्या आत कार्यालयास विनाविंलब सादर करावा असे पञात नमुद असताना सुध्दा चौकशी अधिकारी माञ अघापही चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असेल्याचे जाहुर येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

तरी वरील प्रकाराकडे वरीष्ठ अधिकार्यानी लक्ष देऊन ताक्काळ चौकशी अधिकारी व ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.