एसएफआय नांदेड शहर कमिटीच्या नेतृत्वाखाली आयटीआय विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

सरकारचे आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रातील

आयटीआय आंदोलनाचे केंद्रबिंदु बनवा – कॉ. विनोंद गोविंदवार

 पवन जगडमवार

शिक्षण हे आपल्या उज्वल भविष्याचे साधन आहे. ते आपण घेतलेच पाहिजे,पण आपल्याला सद्यस्थितीत मिळणारे शिक्षण हे खरेच आपले उज्वल भविष्य साकारु शकेल का? याचे उत्तर आहे नाही. ज्या क्षेत्रात आपण शिक्षण घेत आहोत त्या क्षेत्रातील संपुर्ण ज्ञान आपणांस असले पाहिजे,त्यासाठी लागणारे भौतिक सुविधा उपलब्ध असले पाहिजेत तरच एक चांगला विद्यार्थी घडेल.आणि वरील भौतिक सुविधा मिळतच नसेल तर आपण घेत असलेल्या शिक्षणाचा काहीच फायदा होणार नाही.आपल्या शासकीय आयटीआय कॉलेजचेच शिक्षण बघितलं तर समजेल की,आपली परिक्षा ही ऑनलाईन पध्दती नुसार होत असते.आपल्या कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात ग्रामिण भागातुन आलेले आहेत. मुळात संगणक कशा पध्दतीने हाताळायचे याची अनेकांना कुठलीही माहिती नसते आणि त्यातल्या त्यात आपल्या कॉलेज मध्ये वर्षंभर कधीच संगणकाचे शिक्षण दिले जात नाही.परिक्षा जवळ आली की,काही दिवस अगोदर याची माहिती दिली जाते. तेही किती संगणकांवर (दोन),दोन संगणकांवर हजारो विद्यार्थी बसवणे व शिक्षण देणे शक्य आहे का? तर ते मुळीच नाही. एवढ्या कमी वेळात संगणकाची कुठलीच माहिती नसताना ऑनलाईन परिक्षा घेणे हे अत्यंत चुकीचे आहे. याचा स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नांदेड शहर कमिटी विरोध करते. आणि परिक्षा ही ऑफलाईन पद्दतीने झाली पाहिजे यासाठी आग्रही आहे.
दुसरा मुद्दा आहे आयटीआयचा परिक्षा निकाल हा वेळेवर न लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आणि होत आहे.वेळेवर निकाल न लागल्यामुळे विविध कंपन्यांमध्ये असणारे रिक्त जागे सुध्दा भरल्या गेले. यातुन अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे जबाबदार कोण? अनेकांचे वर्ष वाया गेले त्याला जबाबदार कोण? म्हणुनच विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन परिक्षाचा निकाल वेळेवर लागायला पाहिजे ही मागणी SFI घेत आहे.

तिसरा मुद्दा असा आहे की,आपल्याला मिळाणारे स्टायफंड हे किती आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. अशा महागाईच्या काळात मिळणारे तुटपुंजे स्टायफंड ही विद्यार्थ्यांची एक प्रकारची विटंबनाच आहे,असे संघटना मानते. व याचा विचार सरकारने करणे खुप गरजेचे आहे.महिन्याला किमान २५०० स्टायफंड विद्यार्थ्यांना भेटले पाहिजे ही मागणी संघटना करते.

शेवटचा मुद्दा असा की अनेकांचे थेरीचा पेपर तांत्रिक अडचणीमुळे गेलेला आहे. यावर संबंधित विभागाने विचार करुन परत निकाल जाहिर करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. आणि शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये प्रँक्टीकल साठी लागणारे सर्व भौतिक व मुलभुत सुविधा तात्काळ उपलब्ध झाले पाहिजे या व वरील मागण्यांना घेऊन SFI नांदेड शहर कमिटीच्या वतीने आज दिनांक १७/०२/२०२० रोजी दुपारी १२:०० वाजता आयटीआय कॉलेजच्या मुख्य गेटपासुन ते जिल्ह्याधिकारी कार्यालयावर रैली काढुन त्याचे मोर्चात रुपांतर करण्यात आले.जिल्हाधिकारी नांदेड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतमजुर युनियनचे नेते कॉ.विनोद गोविंदवार,मंजुश्री कबाडे,DYFI चे कॉ. अंकुश माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आयटीआय SFI ची युनिट कमिटी व शहर कमिटीने आंदोलन यशस्वी होण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले यावेळी शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.