‘आपला बावळटपणा सगळ्यांना फोटोत दिसतोय’, पाहा रुपाली चाकणकरांनी कुणावर साधला निशाणा

Uncategorized ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुंबई: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसात या दोन्ही महिला नेत्यांमध्ये वाक्:युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

राज्यात महिला, मुलींवर वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्यात यावी यासाठी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात १४ फेब्रुवारीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याविषयी निवेदन देण्यात आलं होतं. राज्यपालांना निवदेन देत असतानाचा एक फोटो देखील त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. पण आता याच फोटोवरुन रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

नेमकी काय टीका केली रुपाली चाकणकरांनी?

‘राज्यात महिला,मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्याबाबत आज महामहीम राज्यपाल यांची भेट या फोटोत दिसणाऱ्या सगळ्या असंवेदनशील नेत्यांनी घेतली.अत्याचार झालेल्या माता भगिनी यांच्या बद्दल आपल्या मनातल्या भावना प्रखरतेने या फोटोत दिसतायत.’ अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ आणि भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

‘किती गांभीर्याने निवेदन दिलय हे दिसतय.थोडी तरी…….असल्या सारखं वागा. दुसर्‍याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना फोटोत दिसतोयच… थोडी शरम करो..’ अशीही टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे. आता यावरुन चित्रा वाघ या रुपाली चाकणकर यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, याआधी चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर या ‘बावळट’ असल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. हिंगणघाट घटनेनंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. सरकारने आतापर्यंत कोणतीही आर्थिक मदत केली नसून जर सरकार मदत करत नसेल तर भारतीय जनता पक्ष हा खर्च उचलणार असंही त्यांनी म्हटलं होतं.

चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं. चित्रा वाघ या प्रकरणात राजकारण आणलं असल्याची टीकाही चाकणकर यांनी केली होती.

यानंतर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘रुपाली चाकणकर ही बाई बावळट आहे.’ याचवेळी त्या माध्यमांना असंही म्हणाल्या होत्या की, ‘तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा.’

दरम्यान, या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, चित्रा वाघ या ओव्हर स्मार्ट आहेत. त्यामुळे त्यांना सर्वजण बावळट दिसताहेत. भाजपचे सरकार आले नाही म्हणून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे