विवाह सोहळ्यात नवरदेवाने उघडले स्व:ताच्या नववधु पत्नीचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते

ठळक घडामोडी देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर : प्रतिनिधी

कासराळी ता.बिलोली जि.नांदेड येथील शाखा पोस्टमास्टर एस.पी.गंगुलवार यांचा दि.१६/२/२०२० रोजी सायंकाळी ६ वाजता शुभविवाह संपन्न झाला ह्या सोहळ्यात नव वराच्या हस्ते वधुचे आय.पी.पी.बी.खाते उघडण्यात आले.

 

यावेळी देगलूर उपविभागाचे डाक निरीक्षक एस.एस.ननिर ,नांदेड डाक कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमँन जि.बि.भिलवंडे ,कुंडलवाळीचे पोस्टमास्टर यलपलवाड,बिलोलीचे पोस्टमास्टर येवतीवाड,सगरोळीचे पोस्टमास्टर सुरकुटलावार ,सुरेश रोडेवाड ,हानमंत जामनोर ,उमेश दोसलवार ,खयुम शेख,बालाजी जाजनुरे,पाडुरंग बहिरवाड,नागनाथ कोरूळे,साखरे,शेख ,पांचाळ ,रामगिरवार ,देशमुख ,पिल्लेवाड आदी.कर्मचारी उपस्थित होते.