लोहा तालुका अध्यक्ष पदी  तांबोळी एन .एच . तर सचिव पदी – दुरपुडे , जिल्हासंघटक पदी  बालाजी भांगे  यांची निवड

नांदेड जिल्हा लोहा

प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका लोहा ची बैठक मा.शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पवार सर यांंच्या अध्यक्षतेखाली .दि.15/02/2020 रोजी घेण्यात आली , यावेळी प्रमुख पाहुणे मराठवाडा सहसचिव – विठ्ठलराव देशटवाड , शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष – संतोष अंबुलगेकर , जिल्हासरचिटणीस – रवि बंडेवार , जिल्हाकोष्याध्यक्ष – गंगाधर कदम , गंगाधर करेवार , जिल्हाउपाध्यक्ष – अविनाश चिद्रावार , गंगाधर ढवळे , जिल्हासंघटक – हमीद मोमीन , भास्कर होनराव , संघटक- हाणमंतराव वल्लेमवार , ढवळे सर उपस्थित होते.

यावेळी शिक्षक सेनेचे होणारे अधिवेशन बाबतीत चर्चा / आढावा घेण्यात आला .  या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागु करणे , समग्र शिक्षा अभियानातील कर्मचारी यांना कायम करणे , अनुदानीत शाळेतील नियुक्ती झालेल्या शिक्षक बांधवाना टीईटी ची अट रद्द करणे , अशैक्षणिक कामे बंद करणे , विषय शिक्षक यांना सरसकट वेतनश्रेणी देणे , आदिवासी भागातील काम करणाऱ्या शिक्षक यांना सातव्या वेतनआयोगानुसार वेतनश्रेणी देणे , अशा अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली सर्व मुद्दे होणाऱ्या अधिवेशनात घेण्यात येणार आहेत. अधिवेशनास जास्तीत जास्त शिक्षक बांधव हजर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले.

 


      खालील प्रमाणे तालुका लोहा कार्यकारणी करण्यात आली . ??अध्यक्ष – तांबोळी एन.एच , ??सचिव – डी.टी.दुरपुडे ?? कोष्याध्यक्ष – वानखेडे सुनिल , ?? कार्याध्यक्ष – लहु पंदलवाड , ?? उपाध्यक्ष पदी , वाघमारे सर , गायकवाड सर , नुकुलवार सर , ?? सह सचिव – जाधव आत्माराम , तिरुपती गुट्टे , गादगे , ?? प्रसिद्धी प्रमुख – घटकार संतोष , ?? महिला आघाडी प्रमुख – सौ.पवार यमुना , लव्हेवर विजयमाला , सौ.दिक्कतवार विमलताई, सौ.कुरे दिपाली ??तालुका संघटक – बंडेवार राजु , गोकोंडे विलास , मेकाले डी.आर , जायेभाये अंबादास , चव्हाण केशव , सापनर गुंडेराव , पाटील ज्ञानेश्वर , मांगिलवार दाऊ , ?? केंद्रसमन्वयक – राजुरकर मुरलीधर (मारतळा ),, वसमतकर मारोती (सोनखेड ) , निळकंठे गौतम (माळाकोळी) , गायकवाड पंढरी (माळेगाव ) , देशमुख गोविंद सुनेगाव ) , राम माने(गोळेगाव ) , ढवळे जळबा (कन्या लोहा ), जाधव सर (पेनुर हायस्कुल प्रतिनिधी ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सर्वांना पुष्पहार घालुन व नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले , भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या