ह.भ.प.निवृत्ती देशमुख महाराज इंदोरीकर यांची बदनामी थांबवा. अन्यथा बदनामी करणा-याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचा इशारा.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र

देवानंद हुंडेकर 

महाराष्ट्रातील समाजसुधारक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनाने महाराष्ट्रातील तरुण मन मस्तक मेंदू सुधारण्याचा प्रयत्न करतो असे समाजसुधारक,महाराष्ट्र भूषण कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची सध्या सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर जी मानहानीकारक बदनामी चालवली आहे,ती बदनामी त्वरित थांबवावी अन्यथा बदनामी करणाऱ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडुन धडा शिकवण्याचा इशारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे.

ह.भ.प.निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांच्या विरोधामध्ये सध्या महाराष्ट्रभर विनाकारण बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत, महाराजांनी आजवर अनेक कीर्तनाच्या माध्यमातून समाज माध्यमांना सुधारण्याचा प्रयत्न केला आहे,परंतु काल कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विरोधात बोलून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महाराजांची बदनामी करण्याच्या कट रचला आहे,महाराजांची बदनामी करण्याचे काम काही अप प्रवृत्तीचे माणसं करत आहे,महाराष्ट्रात महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना सुधारण्याची संधी मिळाली आहे ,ही बदनामी त्वरित थांबवावी अन्यथा बदनामी करनाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे,व बदनामी करणाऱ्याना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद धडा शिकवनार असल्याचा इशारा भागवत देवसरकर यांनी दिला आहे.

यावेळी प्रदेश सल्लागार विजयराव चव्हाण,धनंजय पाटील, शंकर पवार निवघेकर,संदीप पावडे,विनीत पाटील,जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार पांडुरंग पोपळे,ज्ञानोबा गायकवाड,रामदास माळेगावे पाटील,मोतीराम पवार,कपिल तडखिले,सदाशिव पाटील आरसुळे,बालाजी पाटील, पियुष शिंदे शेख अकबर परमेश्वर काळे मंगेश गवळी शेख रहिम संदीप वानखेडे अविनाश कदम भगवान कदम विलास माने सतीश चव्हाण,सुनिल पाटील,शिवशंकर थोटे, अमोल वाघीकर,शिवराज पवार,पांडुरंग पवार,गजानन वरपडे,विकास भस्के,बळवंत ताटे,बळवंत मोरे,नामदेव नरवाडे यांच्यासह कृषी परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी दिला आहे.