येवती येथे मजुरांचे घर जळाल्याने घाटे कुटुंबावर उपासमारीची वेळ !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / प्रतिनिधी

तालुक्यातील येवती येथे १६ फेब्रु. सकाळी ७:०० वा. गणपत माधव घाटे यांच्या घरातील स्वयपाकांचा गॅस सिलिंडर पाईप लिकीजमुळे लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू सह पाच लाखांचा ऐवज जळून खाक ! सुदैवाने जीवितहानी टळली असुन एका शेत मजुरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे ‌

सविस्तर वृत्तांत असा की, येवती येथील शेतमजुरं श्री गणपत माधव घाटे वय ५६ वर्ष यांच्याघरी रोजच्या प्रमाणे सकाळी ७ :०० वा.चहा – किंवा नाष्टापाणी बनवण्यासाठी घरातील महिला गॅस चालू केली असता गॅस सिलिंडरचे पाईप लिकीजमुळे अचानक आग लागली ‌‌‌‌‌‌‌‌असुन खपरेल घर असल्याने त्वरीत घरातल्या तुळई सह वासे दाराना पेठ घेतलें घरातील महिला आरडाओरड करीत घराबाहेर पडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही गावातील आजुबाजुच्या लोकांनी आग विझविण्यासाठी खुप प्रयत्न केले ‌.

त्वरीत मुखेड येथील अग्निशामक गाडीना पाचारण करण्यात आले होते. पण गाडी येईपर्यंत घर जळून खाक झाले होते ‌. सटवा गणपत घाटे या १९ वर्षीय युवकांचे लग्न ठरल्याने लग्नाच्या कपड्यांचा बस्ता बांधुन घरात ठेवले होते. नवरीला सोन्याचे झुमके ,चैन. वाळे, नगदी दोन लाख रुपये,‌सह घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू, भांडी, जुने कपडे. शैक्षणिक कागदपत्रे राशन कार्ड, जातीचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन, ज्वारी, मुग, तुर , उडीद दाळ असे एकूण पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जळुन खाक ! या घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलिस ठाण्याचे काळे साहेब यांनी प्रत्यक्ष येवून घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे ‌.

तर रविवार असल्याने मुखेड तहसील कार्यालयाकडून पंचनामा होने बाकी होता. सद्याला घाटे कुटुंबावर मोठे संकट आले असून शासन व लोक प्रतिनिधींकडून काही तरी त्वरीत आर्थिक मदत मिळावे अशी अपेक्षा पिडीत गणपत घाटे यांची आहे. तर शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत व त्वरित शासनाकडून घर देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील येवतीकर यांनी केली आहे.