जिल्हा परिषद सदस्याचा गैरवापर करुन बौद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर
तालुक्यातील मौजे गारगव्हान येथील बौध्द विहाराची जागा गेल्या ३५ त ४० वर्षा पासुन असलेली ही जागा नमुना नंबर ८ च्या फाॅर्मवर आसुन ही जागा काँग्रेसच्या डोलरी/पळसा जिल्हा परिषदचे सदस्य साहेबराव सावतकर यांनी पदाचा गैरवापर करुन ती बौध्द विहाराची जागेवर ताबा करुन व त्या जागेवर आपल्या आईच्या नावे सरकारी घरकूल बांधण्याचा कार्यक्रम डोरली—पळसा या गटाचे जिल्हा परिषदचे सदस्य साहेबराव सावतकर यांनी केला आहे.तसेच त्यांचे तिन्ही भावंडावर कायदेशीर रित्या शासनानी कडक कार्यवाही करावी तसेच जि.प.सदस्यत्व रद्द करुन गैरकारभार करणार्‍या सदस्याला पदावरुन पाय उत्तार तात्काळ करा अन्यथा आम्हाला भविष्यात बौध्द विहार बचाव आंदोलन करावे लागेल याची प्रशासनानी वेळीच दखल घ्यावी असा इशारा जिल्हा अधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार हदगाव,पंचायत समीती हदगाव इत्यादी कार्यलयास दिनांक १३/०२/२०२० रोजी पत्र देण्यात आले आहे.तसेच या वेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इडिया (खोब्रागडे) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी.डी.वाघमारे तसेच गारगव्हान येथील महीला व पुरुष मंडळी यांच्या साक्षर्‍या करुन कार्यवाईचा इशारा ही प्रशासला दिला आहे.समाजाशी गद्दारी व धम्माशी बेईमानी करणार्‍या बौध्द बांधवाला निश्चीतपणे धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही.आसे ही डी.डी.वाघमारे यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना म्हटले आहे.त्यांच्या सोबत सर्व गारगव्हान जनतेनी एकजूटीने बौध्द विहार बचावासाठी आता मैदानात उतरण्याची गरज असल्याचे चिञ असून गारगव्हाणचे बौध्द बांधवा सह हदगाव तालुक्यात जनतेने चागलाच जोर धरला आहे.
हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या डोलरी/ पळसा गटातून निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य साहेबराव सावतकर यांनी आईचे घरकुल बाधकाम यांना पुढे करून बौध्द विहाराच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक डी.डी.वाघमारे यांनी जिल्हा अधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.गारगव्हान ग्रामपंचायत हद्दीतील बौध्द विहाराची जागेवरील अतिक्रमणाचा पर्दाफाश झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या अतिक्रमणाची जिल्हा अधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार साहेब,व हदगाव पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी लवकर चालु करावी आणि विद्यमान जि.प.सदस्य साहेबराव सावतकर यांचे सदस्यत्व रद्द करावे.
सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी बौध्द विहाराची जागेवर अतिक्रमण केल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे,आसे राज्य शासनाचे आदेश असून राज्यभर या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने देखील मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. असे असताना शासकीय आदेशाला बगल देत काही लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर वापर करून बौध्द विहाराच्या जागेवर अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रकार राजरोसपणे करतांना दिसत आहे. जि.प.सदस्य साहेबराव सावतकर हे आडीच वर्षापुर्वी झालेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत डोलरी/पळसा गटातून निवडून आले आहेत.बौध्द विहाराची जागा हडप करुन या जागेवर स्व:ताच्या आईला शासनाचे घरकुल आलेले आसतांना त्यांनी बौध्द विहाराच्या जागेतच बांधकाम चालु केले आहे.आसे निवेदनात म्हटले आहे.पण ही जागा ग्राम पंचायत कार्यालयात नमुना नंबर ८ च्या उत्ताराला आसुन ही जागा बौध्द विहाराचा नावाने आहे. त्यावर जि.प.सदस्य सावतकर यांनी अतिक्रमण केले यावर कारवाई लवकर व्हावे आशी मागणी ही गारगव्हान येथील महीला व पुरुष मंडळीनी कारवाईची मागणी ही केली आहे.
बौध्द विहाराच्या जागेवर काँग्रेसच्या जिल्हा परिषद साहेबराव सावतकर सदस्यानी अतिक्रम केले आहे.यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी नांदेडचे विषेश पोलीस महानिरिक्षक,जिल्हाधिकारी,व नांदेडचे पोलीस अधिक्षक मगर यांना शिष्ठमंडळासह निवेदन सादर करण्यात आले.या वेळी हदगाव ता.रिपाइं (खोब्रागडे) अध्यक्ष परमेश्वर वाढवे,तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद वाढवे आणि मौ.गारगव्हाण येथील सर्वच नागरिक व भरपूर महिला भगिणि,यूवा,लहान थोर मंडळी ही उपस्थित होते.