राजूरा कॉलेज येथे बारावी च्या विद्यार्थ्यांना निरोप -. मुलानों उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करा – आईवडील व शाळेचे नाव मोठे करा – श्रीरामजी पाटील राजूरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / पवन जगडमवार

प्रतिनिधी – मुखेड तालुक्यातील मोजे राजूर येथिल क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी महाविद्यालयात निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीरामाची पाटील राजूरकर साहेब होते, तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मुखेड चे माझी उपसभापती बाबू सावकार राऊत हे यावेळी उपस्थित होते, तर प्रास्ताविक मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि. बी. रानशेवार सर यांनी विद्यार्थ्यांना यशवंत किर्तीवंत व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली, याप्रसंगी मार्गदर्शन करताना हिवराळे एस. व्ही. यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की शिक्षण म्हणजे नुसते पदवी मिळवणे नसून समाजात सतशील पणे वागणे होय असा संदेश दिला. तर यावेळी इग्रजी विषयाचे प्राध्यापक रवींद्र नवेकर सर यांनी भावी आयुष्य हे उज्वल व्हावे अशी आशा व्यक्त केले तर आनंदराव जंगमवाड यांनी परिक्षेत चांगले यश मिळवा अशा शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ही आपले अनुभव कथन केले, शाळेबद्दल ची आपलेपणाची भावना शिक्षकांन बद्दल चे असलेले आदर, प्रेम, जिवाळा, व तसेच अनेक मित्र मैत्रीणी भेटले या सर्वाचे प्रेम शिक्षकांचे आर्शिवाद घेऊन आम्ही आज शाळेतून जात आहोत आजचा दिवस आम्हाला आयुष्य भर लक्षात राहील असे यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अकरावी च्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली एक आठवण महाविद्यालयात असावी म्हणून एक भेट वस्तू शाळेला दिली ती भेट लक्षवेधी ठरली अनेक विद्यार्थ्यांनच्या डोळ्यात दाटलेले अश्रू यावेळी दिसुन येत होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बुध्दभूषण वाघमारे यांनी केले तर यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक प्रा.एच एन पाटील, प्रा.तुकाराम जाधव सर,प्रा .माधव पाटील खानापूरकर,श्रीमंगले सर, हणमंतराव डोपेवार सर, रघुनाथ गजले, एस एस सगर मॅडम,बत्तुलवाडसर, पोटफोडे बी जी, गव्हाणे सर, काळे सर ,स्वामी यु एस, एम एम कदम,उदगिरेसर, एन. आर पोटफोडे, वाघमारे सर,पत्रकार पवन जगडमवार अदी उपस्थित होते,तर सेवक दिगंबर बाबन्ना राऊत यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते.