देगलूरात सद्गुरू सेवालाल महाराजांची जयंती जल्लोषात साजरी.* *तालुक्यात प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन

ठळक घडामोडी देगलूर नांदेड जिल्हा

 

देगलूर : विशाल पवार

संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी तेलंगणा राज्यात झाला होता.संत सेवालाल महाराज मानवता, भूतदया, निसर्ग प्रेम आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते.”सत्य हाच खरा धर्म आहे आणि नेहमी सत्याचेच आचरण करावे”, अशी शिकवण देणाऱ्या सद्गुरू सेवालाल महाराजांची जयंती देगलूर शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी आयोजकांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणूकीचे बंजारा समाजाचे पारंपारिक भजन मंडळ, विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषासह बंजारा नृत्य सादर करण्यात आले तसेच बंजारा गाण्यावर लेझीमनी देखील जनसमुदायाची मने जिंकली त्याच बरोबर पूलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शाहिदाना श्रध्दाजली देणारा देखील देखावा होता.
शहरातील व तालुक्यातील गोर बंजारा समाजाच्या वतीने शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची २८१ वी जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली.
वसंत नगर कला मंदिर समोरून ते शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत सर्व धर्मीय समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवला.या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी वसंत नगर तांडा, तांडा, शिवणी तांडा, गवंडगाव तांडा, कु शा वाडी, कंटाळी, बेंम्बरा तांडा, धुळा, राजुरा, मानूर, लोणी, दावनगीर तांडा, अंदेगाव तांडा, सेवादास नगर, चव्हाण वाडी, शिळवणी, धनगरवाडी, किनी तांडा येथील हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते.