समर्थ रामदासांची प्रतिष्ठापना

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

 

नांदेड : वैजनाथ स्वामी

नांदेड येथिल श्रीमती गोदावरीबाई उंबरकर चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत श्री सीताराम मंदिरातील ध्यान मंदिरात आज राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींची मुर्ती प्रतिष्ठापना समर्थ वांड़मयाचे अभ्यासक डाॅ. विजय लाड आणि सौ. भक्ती व अमित उंबरकर यांचे हस्ते करण्यात आली.

चिखलवाडी येथे श्री सीताराम मंदिरात साधकांसाठी ध्यान मंदिराची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या म्हणजे माघ व. नवमी हे श्री रामदास स्वामींचे निर्याण ! समर्थ रामदासांनी देह ठेवल्या घटनेला तीनशे अडतीस वर्षे झाली. समर्थ वांड़मयाची शिकवण आजही सर्व सामान्यांना अत्यंत उपयुक्त असून रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ जीवन जगण्याची कला शिकवतो. श्री समर्थ विद्यापीठाचे अनेक उपक्रम नांदेड येथून चालत आहेत.
समर्थ रामदासांच्या मुर्ती प्रतिष्ठापनेसाठी नरेश कुळकर्णी , गोपाळ जोशी, दिपक देशपांडे, श्रीपाद कुळकर्णी व किशोर जोशी या ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.