मुलांमधील मानसिक समस्येविषयी पालका मध्ये जागर

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा

नांदेड : वैजनाथ स्वामी

कुसुम ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको, नांदेड , येथील प्रशासनाने पालकांसाठी व शिक्षकांसाठी , मुलांच्या मानसिक अणि शैक्षणिक समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी डॉ रामेश्वर मल्लिकार्जुन बोले, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले. मुलांमधील मानसिक समस्या जसे चिंता, भीती, नैराश्य,अंथरूणात लघवी करणे, न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता तसेच वर्तनुकीतील दोष जसे हट्टीपणा, जिद्दी पणा, उद्धटपणा अणि गुन्हेगारी प्रवृत्ती, मोबाईल चा अति वापर इत्यादी ची कारणे व समुपदेशन या वर त्यांनी मार्गदर्शन केले. आजची मुले म्हणजे उद्याचे भविष्य आहे अणि ते जर मानसिक अणि शारीरिक दृष्ट्या निरोगी अणि सक्षम असेल तरच देश प्रगती करेल असे डॉ रामेश्वर बोले यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. संभाजी माणिकराव बिरादार ,सह सचिव श्रीमती शशिकला संभाजी बिरादार पर्यवेक्षक श्री. भालेराव अणि श्री. शेख, श्री शंकर बिरादार अणि विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री हम्मबर्डे यांनी केली. शेकडो पालकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.