श्री वरद विनायक गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : संदीप पिल्लेवाड
                       मुखेड येथील डॉ. हेडगेवार चौक येथील श्री वरद विनायक गणेश मंदिराचा व मूर्ती स्थापनेचा 15 वा वर्धापन दिन माग वैद्य पंचमीच्या मुहूर्तावर उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
मुखेड शहरातील डाॅ.  हेडगेवार चौक येथे गरुडकर परिवाराने श्री वरदविनायक गणेश मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराचा 15 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे. यावेळी श्री वरद विनायक गणेशास महाभिषेक करण्यात आला आहे. वेदमूर्ती नागेश महाराज पालकर यांच्या मंत्र उच्चारात विधीवत श्री गणेश याग, गणपती अथर्वशिष्य, होम हवन आदी धार्मिक विधी करण्यात आला आहे.
यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. याप्रसंगी यजमान श्री सत्यवान गरुडकर, सौ. आशा सत्‍यवान गरुडकर, सुरेश गरुडकर, सौ. सुनिता सुरेश गरुडकर व गडकर परिवार तसेच मंदिराचे पुजारी हरिहर देशमुख सलगरकर, नगरसेवक चंद्रकांत गरुडकर, दत्तात्रेयराव कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, अशोक वावधाने,  डॉ. विनायक कौरवार सह अनेक गणेशभक्त उपस्थित होते. श्री वरद विनायक गणेश भगवान की जय च्या जयघोषात वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.