सर्व ऑटो/टॅक्सी चालक-मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक 

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
नांदेड : वैजनाथ स्वामी
            नांदेड जिल्ह्यातील सर्व ऑटो / टॅक्सी चालक -मालकांना/बॅजधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजना अशा दोन जनतेच्या हितार्थ योजना जाहीर केल्या आहेत. व्यावसायिक वाहन चालक यांनी या योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानुसार सर्व ऑटो / टॅक्सी चालक – मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेतल्याशिवाय त्यांचे वाहनासंबंधी परवाना / योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. या योजनेकरिता अर्ज सार्वजनिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्यामार्फत करण्यात यावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.