श्री.छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट सामने

नांदेड जिल्हा मुखेड
 बाराहाळी: पवन कँदरकुंठे
           श्री छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट सामने 15 फेब्रुवारी 2020  रोज शनिवार पासून आयोजित करण्यात आले आहे.
                       सविस्तर मााहिती अशी की,या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक 11111 द्वितीय पारितोषिक 7000 तृतीय पारितोषक 5000 मॅन ऑफ द सिरीज 2222 असे विविध पारितोषक ठेवण्यात आले आहे.
                              या कार्यक्रमाचे उद्घाटक मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब माननीय गंगाधर राठोड साहेब जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड मुखेड पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर तसेच प्राचार्य हरिदास राठोड सरपंच गोवर्धन पवारयांच्या हस्ते होणार आहे तरी ग्रामीण व शहरी भागातील सर्व क्रिकेट प्रेमींनी याचा आवश्य लाभ घ्यावा व या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान समिती टी जी आर क्रिकेट क्लब  वसंत नगर तसेच सुधीर चव्हाण मित्र मंडळ यांच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे.