नांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड / वैजनाथ स्वामी

नांदेड जिल्हयाचे  जिल्हाधिकारी म्हणून पी. शिवा शंकर यांची नियुक्ती अपर सचिव सीताराम कुंटे यांनी केली आहे.

 

नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरुणकुमार डोंगरे यांच्या जागी पी. शिवा शंकर यांची परभणीहुन नांदेडच्या जिल्हाधिकारी म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे. पी शिवा शंकर हे 2011 सालच्या आय.ए.एस.चे विद्यार्थी आहेत. तर पी. शिवा शंकर हे कडक व शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित आहेत.

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे शिस्त आणि कडक स्वभावाचे असल्याने नांदेड जिल्ह्यातील माफियागीरीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पी. शिवशंकर यांनी २०११ च्या बॅच चे आय ए एस अधिकारी म्हणून यश मिळविले होते. वर्धा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. परभणी येथे ३ एप्रील २०१७ पासून परभणीचे जिल्हा अधिकारी म्हणून रुजू होते. वाळू माफियांचा कर्दनकाळ म्हणू त्यांच्याकडे पाहिले जाते.