मुखेड पंचायत समिती भोवती अनुदानासाठी लाभार्थ्यांच्या चकरा…नोव्हेंबर अखेर पासून घरकुलांचे अनुदान मिळेणा ; एकुण ५ हजार २७६ मंजूर घरकुलांपैकी २५४४ घरकुल पूर्ण तर २७३२ अपूर्ण.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदिप पिल्लेवाड
      केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना राहण्यासाठी हक्काचे मजबुत घर व्हावे म्हणून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना व रमाई घरकुल अावास योजना या योजनेअंतर्गत घरकुलांचे बांधकाम पुर्णत्वास नेण्यासाठी  लाभार्थ्यांना टप्याटप्याने अनुदान दिल्या जाते मात्र मुखेड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर अखेर पासून अनुदान हप्ते मिळत नसल्यामुळे घरकुलांचे कामे रखडले असुन अनुदानासाठी लाभार्थि संबंधित घरकुल विभाग व पंचायत समिती भोवती चकरा मारताना दिसून येत अाहेत
      राज्यातील ज्या नागरिकांना राहण्याकरिता पक्के घरे नाहीत अशा गोर-गरिब जनतेस हक्काचे मजबूत पक्के घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून शासनाकडुंन लाभार्थ्यांना टप्याटप्याने १ लाख ५० हजार रूपयाचे अनुदान दिल्या जाते त्यामध्ये १ लाख २० हजार घरकुल विभागाकडून, १२ हजार शौचालय विभाग, तसेच १८ हजार एमअार ईजीएस विभागाच्या वतीने मस्टर मागणी पद्धतीने हप्त्याहप्त्याने देण्यात येते मात्र हे अनुदान घरकुल बांधणीसाठी वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थ्यांची हेळसांड होत असुन अनुदानासाठी लाभार्थी संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्या भोवती साहेब माझे बिल काढा हो म्हणत चकरा मारताना दिसत आहेत त्याचबरोबर मुखेड तालुक्यासाठी सन २०१६ -१७ ते २०१९ -२० या कालावधीत एकुन ५ हजार २७६ घरकुलांना मंजुरी मिळाली असुन यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ४२४९ घरकुल व रमाई घरकुल अावास योजनेतून १ हजार २७ घरकुल मंजूर झाले अाहेत त्या मंजूर घरकूलाच्या अनुदानापैकी पहिला हप्ता ३ हजार ७२४ लाभार्थ्यांना मिळाले तर दुसरा हप्ता २ हजार ५५९ लाभार्थ्यांना देण्यात अाले तसेच तिसरा हप्त्याचे अनुदान २ हजार १०१ लाभार्थ्यांना मिळाले त्याचबरोबर चौथा हप्ता १ हजार १९२ लाभार्थ्याना अनुदान मिळाले एकुन ५ हजार २७६ मंजूर घरकुलांपैकी २ हजार १०७ घरकुलांची कामे पुर्ण झाले असुन २ हजार १४२ घरकुलांची कामे अपुर्ण आहेत त्याचबरोबर १ हजार १६५ लाभार्थ्यानी घरकुलांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान घेवुनसुद्धा घरकुलबांधणीस सुरूवात केले नाही तसेच रमाई घरकुल योजनेच्या १ हजार २७ मंजुर घरकुलांपैकी ४३७ घरकुल पूर्ण झाले अाहेत तर ५९० घरकुल अपुर्ण असल्याची असल्याची माहिती घरकुल विभागाच्या कर्ममचाऱ्यांनी सांगीतले तालुुुुक्यात १२८ ग्रामपंचायत अाहेत ५० तेे ६० कि.मि.वरुन नागरिक कामानिमित्त पं.स.कार्यालय गाठतात तेथे घरकुल विभागात आपल्या समस्या घेवुन आल्यानंतर त्या संमस्येच निवारण करण्यासाठी कर्मचाारी भेटेना जर भेटलेच तर त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यांना निराश होवुन अाल्यापाऊली आर्थिक भुर्दंड सोसत परत जावे लागते अशी संतप्त प्रतिक्रिया लाभार्थ्यांतुन एैकवयास मिळत आहे   नागरिकांची अशाप्रकारे होत असलेली गैरसोय थाबंविण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी सुज्ञ नागरिकातुन होत अाहे

               पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचा विभाग असुन याठिकाणी मागील २ महिण्यापासुन ३ कर्मचारी बदलले अाहेत  लाभार्थ्यांचे कांमे करण्यासाठी खुर्चिवर कर्मचारीच टिकेना कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कळेना की घरकुल विभागातील कर्मचारी कोण? लाभार्थी संभ्रमात आहेत त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी याविषयी  गांभीर्य लक्षात घेवुन लक्ष द्यावे अशी मागणी लाभार्थ्यांतुन होत आहे