ग्रा.पं. निवडणुकीपुर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करा – नागनाथ बेळीकर

इतर बातम्या नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
                     तालुक्यातील 24 ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार असुन यात सरपंच पदासाठी आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही यामुळे  निवडणुकीपुर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करा असे निवेदन तहसिलदार काशिनाथ पाटील यांना कॉग्रेसचे नागनाथ पाटील बेळीकर यांनी दि. 12 रोजी दिले.              ग्राम पंचायतच्या निवडणूकीत सरपंच पदाचा उमेदवार कोण हे जनतेला माहित होणे गरजेचे असते त्यामुळे गावातील विकासाची दुरदृष्टी असणारा व्यक्ती सरपंच पदासाठी समोर येऊ येतो पण सध्या 24 ग्राम पंचायतच्या निवडणूकी दरम्यान सरपंच पदाचे आरक्षण कोणास आहे हे माहित नसल्याने गोंधळ उडाला आहे.

यामुळे सरपंच पदाचे आरक्षण निवडणूकीपुर्वी जाहिर करावे अन्यथा ग्राम पंचायतच्या निवडणूकीत बहीष्कार टाकण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला. या निवेदनावर नागनाथ पाटील बेळीकर यांच्यासह शिवाजी गोविंदराव पाटील, शिवाजी हाणमंतराव पाटील, बालाजी उमराव पाटील, मारोती तुकाराम वाडीकर,उध्दव गोविंदराव पाटील,आनंदराव किशनराव जुन्ने यांच्या स्वाक्ष­ऱ्या आहेत.