ग्रामीण महाविद्यालयात तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन

नांदेड नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : पवन क्यादरकुंटे
                    मुखेड-ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेड येथे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधर राठोड हे असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रा. शंकर राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत.
   स्नेहसंमेलनाचा समारोप समारंभ दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. सतीश कुमदाळे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी देगलूर विभाग देगलूर व जि. प. सदस्य संतोष राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी विविध सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत यात वाद- विवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,आयत्या वेळेचे भाषण, रांगोळी स्पर्धा ,नृत्य स्पर्धा,गायन स्पर्धा,फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गद्य व संगीत शेलापागोटे या स्पर्धांचा समावेश आहे.
    तेव्हा वरील तीन दिवशीय स्नेहसंमेलनाचा लाभ साहित्यप्रेमींनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.व्यंकट चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण,क्रिडा विभाग प्रमुख प्रा.सुभाष देठे,विद्यापीठ प्रतिनिधी शशिकांत कदम, विद्यार्थी संसद सचिव कु.शिवकन्या कागणे व सर्व वर्ग प्रतिनिधी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.