धम्मक्रांतीच्या रक्षणासाठी शील आचरण करा – धम्मचारी आचलरत्न

नांदेड नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड : प्रतीनिधी
          डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आँक्टोंबर 1956 महान असी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीचे प्रथम लाभार्थी आपण आहोत, मग या धम्मक्रांतीचे रक्षणासाठी आपलीच जबाबदारी आहे, जर धम्मक्रांतीचे रक्षण करण्यासाठी आपन त्रिरत्नास अनुसरून शील आचरण करावे असे अव्हान धम्मचारी आचलरत्न पणे,यांनी त्रिरत्न बौध्दमहासंघ नांदेड यांनी, आयोजित केलेल्या  तालुक्यातील चांडोळा येथील एक दिवसीय धम्मशीबीरात मार्गदर्शन केले.
                      या शिबीराचे उद्दघाटन आयु केरबाजी गायकवाड, गुंडेराव गायकवाड, मारोतराव, गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले, धम्मचारी आनंदगर्भ मुखेड यांनी त्रिसरण पंचशील, बुध्दपुजा, समर्पण संमारंभ या गाथेचे पठण करून, आनापानसती,ध्यान, व मेत्ता भवना,ध्यानावरील माहिती, ध्यानाचा करून घेण्यात आले, या शीबीरात14०बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,या शीबीराचे प्रास्ताविक, संचालन, धम्मचारी आनंदगर्भ यांनी केले, आभारप्रदर्शन मधुकर वाघमारे यांनी केले.
                    हे शीबीर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र व्यंकट गायकवाड, धम्ममित्र मधुकर वाघमारे, दिगांबर गायकवाड, आनंदा टोम्पें,दत्ता वाघमारे, सुरेश गायकवाड, विजय टोम्पें, रावसाहेब गायकवाड, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, विचार मंच चांडोळा ई विशेष परिश्रम घेतले,