रक्तदानाविषयी भीती न बाळगता रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे – प्राचार्य डॉ.राठोड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही तयार करता येते पण रक्त तयार करता येत नाही. रक्तदानातून रक्तदात्यांना परोपकार केल्याचे समाधान लाभते.याचे फायदे विद्यार्थ्यांना पाच गुण मिळवण्यासाठी व उद्या नौकरी मिळविण्यासाठी होतात तर रक्तदानाविषयी भीती न बाळगता रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी प्राणिशास्त्र असोसिएशन व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथे आयोजित रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना केले.


कार्यक्रमास उद्घाटक म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा श्रीमती चक्रवतीबाई गोविंदराव राठोड ह्या होत्या. त्यांनी रक्तगट व आर एच फॕक्टरचे जनक लॕन्डस्टायनर व विनीयर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू घाडगे (जनसंपर्क अधिकारी, इंडियन रेडक्रास सोसायटी नांदेड), तंत्रज्ञ अभिजीत चिंचपूरकर, तंत्रज्ञ प्रीतम धुळे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीनिवास पवार, प्राणीशास्त्र असोशिएन समन्वयक तथा माजी कार्यक्रधिकारी प्रा. डॉ. महेश पेंटेवार, रासेयो कार्यक्रधिकारी प्रा.एस.बाबाराव, कार्यक्रधिकारी शंकरय्या कळ्ळीमठ, शिवाजी मसुरे,संदीप लांडगे यांची उपस्थिती होती.
यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी नांदेडचे तंत्रज्ञ अभिजीत चिंचोळकर यांनी रक्तदानाबध्दल विस्ताराने माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. बाबाराव यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की मानवी जीवनात दानाचे अत्यंत महत्त्व आहे. त्यात रक्तदानाचे सर्वाधिक महत्त्व असल्यामुळेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी 35 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार प्राणिशास्त्र असोसिएशन समन्वयक प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांनी मानले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. श्रीनिवास पवार, प्राणिशास्त्र असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. महेश पेंटेवार, रा.से.यो. कार्यक्रधिकारी प्रा. शंकरय्या कळ्ळीमठ, कार्यक्रधिकारी प्रा.एस.बाबाराव, रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी श्याम तेलंग, प्राणीशास्त्र असोसिएशनच्या अध्यक्षा कु.कविता जेधे, रा.से.यो. सल्लागार समिती सदस्या प्रा.सौ. अरूणा ईटकापल्ले, प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्रा.देविदास पवार व प्राणीशास्त्र असोसिएशनचे सर्व सदस्य, रासेयोचे सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.