धनंजय मुंडेंची दिलदारी.फ्लाईट चुकलेल्या जवानाला काढून दिलं तिकीट!

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

औरंगाबाद | अडचणीत सापडलेल्या जवानाच्या मदतीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंंजय मुंडे धावून गेले आहेत. त्यामुळे या जवानाला वेळेवर ड्यूटीवर जाता आलं. वैभव मुंडे असं या जवानाचं नाव असून तो बीएसएफ काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.

श्रीनगरला कामावर रूजू व्हायला निघालेल्या वैभवचे औरंगाबाद येथून दिल्ली मार्गी श्रीनगरसाठी सकाळी 8 वाजता विमान होतं. पण औरंगाबादला येणाऱ्या रेल्वेला उशीर झाल्यामुळे विमानतळावर पोहचण्यास वैभवला वेळ लागल्याने श्रीनगरला जाणारं विमान चुकलं. यावेळी धनंजय मुंडे त्याच्या मदतीला धावून गेले.

मुंबईला निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर भेटेल्या जवानाची चौकशी केली. घडलेला प्रकर कळताच धनंजय मुुंडे यांनी आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ जवान वैभवसाठी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट औरंगाबाद-दिल्ली-श्रीनगर असं तिकीट काढून दिलं आहे.

दरम्यान, मुंडे यांनी ऐनवेळी केलेल्या मदतीबद्दल बीएसएफ जवान वैभव यानेही त्यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे आभार मानले.