शेतकऱ्यांनी हक्काच्या मागणीसाठी मेळाव्यात सहभागी व्हावे-शिवशंकर पाटील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे.कर्जमाफीला लावलेल्या अटी रद्द करून,सातबारा कोरा झाला पाहिजे.शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा 12 तास लाईट दिली पाहिजे.

 

या मुख्य मागण्यासाठी भव्य शेतकरी मेळावा नायगाव येथे दि.13 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचे नेते मा.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.आपण सर्व शेतकरीपुत्र व शेतकरी यांनी या मेळाव्याला हजर रहावे असे आव्हान रयत युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा मागण्या मंजूर करण्यासंबंधी सरकारवर दबाव टाकला पाहिजे.यासाठी शेतकऱ्यांनी या शेतकरी मेळाव्यात सहभागी व्हावे.