मुखेडात २४ ग्राम पंचायतीची निवडणूक लागणार ;   मुदत संपत असल्याने नव्याने पंचवार्षिक निवडणुका                    घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजडतालुक्यातील १ ऑक्टोबर २०१९ ते दि. २० न २०२० पर्यंतच्या २४ ग्रामपंचायतींची निवडणूकीची मुदत कालावधीत संपत असल्याने  तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू  करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी लोकभारत न्यूजला दिली आहे.

त्यासाठी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये  प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असुन यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांच्यासह पंचायत समिती तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांंची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.दरम्यान तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या धुरळा उडणार असल्याने अनेकांनी सरपंच पदासाठी आतापासुनच गुडघ्याला बाशिंग बांधलेले दिसून येते.

……………………….
या ग्रामपंचायतींच्या निवडणुका

शिरुर दबडे, कोटग्याळ, आडलुर/नंदगांव, सांगवी भादेव, गोणेगाव, चव्हाणवाडी, आखरगा, हिप्परगा दे, उंद्री प दे, सांगवी बेनक, चिवळी, बेरळी बु, बेरळी खु. ,धनज / जामखेड,डोरनाळी, राजुरा तांडा, मेथी/ खपराळ, तग्याळ, मंडलापुर, वर्ताळा, येवती, राजुरा बु, मारजवाडी, ईटग्याळ पदे या ग्राम पंचायतच्या निवडणूका होणार आहेत.

  ………………………………..
या २४ ग्राम पंचायतीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच कधीही
   निवडणुकीची तारीख येवू शकते .
                              कशिनाथ पाटील
                              तहसीलदार मुखेड