मुखेडात संत शिरोमनी गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
                  मुखेडमध्ये चर्मकार  युवा संघटनेच्या वतीने संत शिरोमनी गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी  करण्यात आली . यावेळी पोउनि भाऊसाहेब मगरे व  पो जमादार जायभाये  यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार घालुन  कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
              गुरु रविदास महाराज यांचा जीवन परिचय, सामाजिक कार्य  यावर मनोगते व्यक्त केली. यावेळी  चर्मकार युवा संघटनेचे अध्यक्ष गोविंद गंगासागरे , अ.भा . गुरु रविदास समता परिषदेचे युवा ता. अध्यक्ष राजु भालके , सचिव सुरेश जमदाडे, शिवाजी गंगासागरे , राजेंद्र वर्ताळकर , संतोष तेलंग, उमाकांत वडजे , सुरेद्र गादेकर , भगवान मुसळे  , पटेल सर, दिगंबर  जमदाडे , लक्ष्मण जमदाडे ,लालबा वाघमारे , प्रणव करकले , लक्ष्मण करकले , माराती वाघमारे , संजय झांगडे यांची  उपस्थिती होती .