जास्त नाटकं कराल तर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, राज ठाकरे आक्रमक

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

 

मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मुंबईत मनसे’च्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गिरगाव पासून मोर्चाला सुरुवात झाली असून आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. तसेच यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. या महामोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत दाखल झाले आहेत. महामोर्चात सहभागी होण्याआधी राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपली भूमिका मांडली. यावेळी आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. पण जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. असा आक्रमक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ज्या देशाने तुम्हाला सगळ दिल त्याला बरबाद करायला कशाला बसलाय असा सवाल देखील त्यांनी गरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणार्यांना विचारला आहे.