मुखेड येथील  लोकन्यायालयात 111 प्रकरणे निकाली   11 लाख 70 हजार 161 रुपयांची वसूली

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : संदीप पिल्लेवाड

विधी सेवा समितीच्या वतीने मुखेड येथील  दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे शनिवारी दि 8 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक न्यायालयात  111  प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर 11  लाख 70 हजार 161 रुपयांची  वसूली झाली आहे .

मुखेड येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात जिल्हा न्यायाधीश एन.पी. त्रिभुवन, वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.टी. शिंदे, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश सतीश शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश नमृता बिरादार यांनी विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आहेत. पॅनल पंच म्हणून ॲड.आशिष कुलकर्णी, ॲड. गोरोबा कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले आहे.या लोक अदालती मध्ये   फौजदारी दाव्यातील 10 व दिवाणी दाव्यातील 35 व दाखल पूर्व प्रकरणे 66 असे एकूण 111   प्रकरणे समोपचाराने  निकाली  काढण्यात आली आहेत . तर  या लोक अदालती  प्रकरणात मुखेडच्या स्टेट बँक ऑफ इंडिया,  स्टेट बँक ऑफ बडोदा , महाराष्ट्र ग्रामीण बॅन्क,व  सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया व पंचायत समिती मुखेड च्या हद्दीतील ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. यात बँक प्रकरणात 74 हजार ५०० रु वसुली व इतर प्रकरणात 10 लाख 95 हजार 161 रु. असे एकुण 11 लाख 70 हजार 161 रु वसुल करण्यात  आले आहेत.

या वेळी 1197  प्रकरणे निपटारा करण्यासाठी घेतली होती.या प्रकरणातून 111 प्रकरने व 11लाख 70हजार 161 रुपये वसुली  करण्यात आली आहे.

यावेळी  तदर्थ जिल्हा न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस . टी. शिंदे , दिवाणी न्यायाधीश एस.जि. शिंदे,  सह दिवाणी न्यायाधीश  नमृता बिरादार उपस्थित होते.  , पॅनल पंच अॅड. आशिष  कुलकर्णी ,अॅड.  जी .एस. कांबळे,अॅड. सोमवारे,अॅड. के. एस देवणीकर, राठोड, गंदीगुडे, बनसोडे,  यांनी काम पाहिले. न्यायालयीन कर्मचारी पि.के .कांबळे ,एम. पी .मुखेडकर ,संतोष ढाकणे,डि.एस. चव्हाण आर. येरेवाड, एन निवडंगे, बालाजी वडजे ,देशमुख, नकीतवाड, कपिल, एन.डी.ताटे ,जी.एस. गायकवाड ,बी. श्रीरामे, यांनी  यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहेत.