नगराध्यक्ष देबडवार यांनी घेतली अशोकराव चव्हाण यांची भेट             शहराच्या विविध विकास कामासाठी निधीची केली मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मागील अनेक वर्षापासुन शहरातील प्रलंबित कामा संदर्भात नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची दि. 08 रोजी नांदेड येथे भेट घेऊन विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

यात विशेष रस्ता अनुदानासाठी 5 कोटी निधी दयावा, शहरातील विठोबा मंदीरासाठी रखडेलेला निधी पुर्ण दयावा, मागील सरकारच्या काळातील रखडलेले 1 कोटी 60 लाख रुपये अनुदान दयावे, वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत भरीव निधी दयावे, शहरात विद्युतीकरणासाठी सोलार योजना कार्यान्वीत करण्यासाठी निधी दयावी, नाले, रस्ते निधी संदर्भात निधी, शहरात अंडर ग्राऊंड ड्रेनेजसाठी निधी, जि.प. शाळेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करणे अशा विविध कामासाठी निधी मागितला.

ज्या खात्याची कामे आहेत त्या कामांना तात्काळ निधी मंजुर करुन शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे अशोकराव चव्हाण यांनी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांना सांगितले असून सर्व विषयावर सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली असल्याचे जिल्हा कॉग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगीरे यांनी लोकभारत न्यूज दूरध्वनीवरून सांंगितले .


मागील अनेक वर्षापासुन नपामध्ये विकास कामांना खिळ बसली असून पण सध्या अशोकराव चव्हाण मंत्री झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर मुखेड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष , सभापतीपद देऊन मुखेडकडे विशेष लक्ष असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी दाखवून दिले यामुळे या विकासकामांच्या निधीला सुध्दा कमी पडणार नाही असे यावरुन तरी दिसत आहे.