ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीत कोसळला, सात ऊसतोड कामगारांचा मृत्यू

इतर बातम्या ठळक घडामोडी महाराष्ट्र

बेळगाव : पुलावरुन ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला कामगारांचा मृत्यू झाला (Tractor Accident). खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावर ही दुर्देवी घटना घडली आहे. 15 हून अधिक महिला ऊसतोड कामगार ट्रॅक्टरवरुन आज सकाळी बोगुर गावातून इटगीकडे जात होत्या. मात्र, बोगुर पुलावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला (Belgaon Tractor Accident).

या अपघातात सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक महिला कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही दुर्घटना नंदगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेत तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ यांचा मृत्यू झाला आहे.