अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

इतर बातम्या ठळक घडामोडी महाराष्ट्र

मराठी अभिनेत्री मानसी नाईक ५ फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे सायंकाळी वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कला सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी मानसी नाईकने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याशिवाय याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे.

सामान्य महिलांची सुरक्षा तर सोडा पण सेलिब्रिटी असणाऱ्या महिला सुद्धा सुरक्षित नाहीत का ? म्हणजे महिला ही कायम असुरक्षितच आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने इथे उपस्थित राहतो आहे.