“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?” – देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाईट लाईफ योजनेवर टीका केली आहे. श्रीमंतांच्या मुलांच्या नाईटलाईफची काळजी तुम्ही घेतली, आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या नाईट लाईफची काळजी कधी घेणार, असा सवाल त्यांनी केला आहे. ते परभणीतील कृषी फेस्ट कार्यक्रमात बोलत होते.

नाईट लाईफच्या निर्णयामुळे श्रीमंतांच्या मुलांची चंगळ झाली. पण शेतकऱ्यांची मुलं रात्री-बेरात्री शेतात काम करत असतात. विंचू-किड्यांच्या सानिध्यात ते काम करत असताना. रात्री शेताला पाणी द्यायला जावं लागतं. अशा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही काय केलं, असं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. जाणीवपूर्वक काही टेक्नीकल गोष्टी सांगायच्या, असा या नव्या सरकारचा इरादा आहे, असं ते म्हणाले आहेत.

कोणतेही टेक्नीकल कारणे सांगून मराठवाड्याची वाॅटर ग्रीड योजना थांबवण्याचा प्रयत्न झाला तर तो मराठवाड्यावर अन्याय असेल, असं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहेे.