मुखेड तालुक्यात आशा दिवस उत्साहात साजरा 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
           राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका यांची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण देण्यासाठी आरोग्य सेवेचा पूरक घटक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येते याच अनुषंगाने दि ०३ रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले यांच्या प्रमुख तालुक्यात आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
          या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकेच्या  गीत गायन स्पर्धा,  वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा  असे विविध कलागुणांनी स्पर्धा घेऊन प्रथम द्वितीय पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांच्या आरोग्य विविध तपासण्या  करण्यात आल्या. त्यांनी केलेल्या कामातून तालुक्यातून प्रथम  पद्मीनबाई संजय कांबळे व द्वितीय  निलावती संग्राम बर्गे यांना गौरविण्यात आले.
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राजकुमार ढवळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवदास तोटेवाड आरोग्य पर्यवेक्षक चंद्रकांत जाधव, व्यंकटराव माचणवाड, रेखा रहाटकर, प्रविन खलसे, एन आर गुरफळे, अमोल चव्हाण , ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह अनेकांनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक बाबाराव येलुरे यांनी केले .