अल्पवयीनांना आंदोलनात सहभागाची परवानगी नसावी, 15 वर्षीय मुलीची सुप्रीम कोर्टात याचिका..अल्पवयीन मुलांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ नये

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

सध्या विविध विषयांवरून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केली जात आहेत. मात्र, या सगळ्या आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.

याच मुलांचा आंदोलनामध्ये सहभाग होऊ नये म्हणून त्याविरोधात पंधरावर्षीय झेन सदावर्तेने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिकेमध्ये स्पष्टपणे असं मांडण्यात आलं आहे की, अल्पवयीन मुलांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ नये. ज्येष्ठ कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची झेन ही कन्या आहे.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली असून लवकरात लवकर यावर सुनावणी करण्यात यावी अशी इच्छा झेन सदावर्तेने व्यक्त केली आहे.